सोमवार दि.२७ मे रोजी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहिर होणार निकाल
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. २७ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.
राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.














