एकूण 1 लाख 56 हजार 308 मतदारांनी केले मतदान
सर्वाधिक मतदान कुडाळ मालवण मतदारसंघात
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : विधानसभा निवडणूक मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 1 लाख 56 हजार 308 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाच्या 23 .02 % मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कुडाळ मालवण मतदारसंघात 55 हजार 325 , कणकवली मतदारसंघात 49 हजार 165 तर सावंतवाडी मतदारसंघात 51 हजार 818 मतदारांनी मतदान केले.













