मोठी बातमी ! सतीश सावंत यांची विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीतून माघार

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीमधून मी माघार घेत असल्याचे शिवसेना उबाठा कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले. विधानसभेसाठी मी सावंतवाडी मतदारसंघातून जास्त इच्छुक होतो मात्र तेथे आता राजन तेली यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे माझा दावा मागे घेतला आहे. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघात ही उमेदवारी साठी मी इच्छुक होतो मात्र पक्षहीता साठी मी माघार घेत असल्याचे सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर उपस्थित होते.

error: Content is protected !!