सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम
ओरोस (प्रतिनिधी) : मद्यपान करून वाहन चालविणे आणि दरापेक्षा जास्त तिकीट आकारणी केल्या प्रकरणी ५५ हून अधिक वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसांत कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने 30 व 31 मे 2024 रोजी ओरोस, कासार्डे, ओसरगाव टोल नाका विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का ? याबाबत तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण 55 हुन अधिक वाहनचालकांची तपासणी केली. याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक विनोद भोपाळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील, अमित पाटील व वाहन चालक एस व्ही स्वामी उपस्थित होते.