आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चा 1 जून रोजी तृतीय वर्धापनदिन

भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे सायं.4 वाजता संपन्न होणार वर्धापनदिन सोहळा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अल्पावधीत लाखो वाचक दर्शकांच्या हृदयात विश्वासार्ह बातम्यांनी अढळ स्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल चा तृतीय वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.1 जून रोजी सायंकाळी 4 वाजता भगवती मंगल कार्यालय मराठा मंडळ रोड, कणकवली येथे दिमाखात संपन्न होणार आहे. केवळ 3 वर्षांच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल ने आपले नाव सर्वांच्याच मनात कोरले आहे. निर्भीड, विश्वासार्ह आणि रोखठोक पत्रकारितेचा वसा जोपासताना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल ने सामाजिक भान सुद्धा जपले आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला विधायक दिशा देणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना तृतीय वर्धापनदिन निमित्त पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी , राजकीय पदाधिकारी , समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या तृतीय वर्धापनदिन सोहळ्यास आमचे जाहिरातदार, सर्व वाचक, दर्शक , हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!