सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : भारताच्या 18 व्या लोकसभेचे पंतप्रधान म्हणून एनडीए चे नेते नरेंद्रभाई मोदी यांनी 9 जून रोजी शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा भाजपाचा पंतप्रधान होण्याचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष याची डोळी याची देही पाहण्याची संधी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी अक्षय अजयकुमार सर्वगोड यांना मिळाली. अक्षय हे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे सुपुत्र आहेत. युवा उद्योजक म्हणून स्टार्ट अप मध्ये यशस्वी झालेले अक्षय हे सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अक्षय सर्वगोड यांना सन्मानपूर्वक माननीय पंतप्रधान यांच्या शपथग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत लेखी पत्र पाठविण्यात आले होते. या सुवर्णसंधीचा लाभ घेत पंतप्रधान मोदी यांच्या ऐतिहासिक शपथग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याची अविस्मरणीय संधी अक्षय याना मिळाली. आपला सुपुत्र अक्षय याला पंतप्रधान मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचाही ऊर आनंदाने भरून निघाला. आपला आनंद व्यक्त करताना कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा..अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे.