नेरूर वाघचौडी येथे १८ रोजी जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ओमकार मित्रमंडळ वाघचौडी यांच्यावतीने जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन शनिवार १८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता एम आय डी सी येथील विराज प्लास्टिक कंपनी जवळील वाघचौडी शूटिंग बॉल स्पर्धा मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ७००१ रुपये, द्वितीय क्रमांक ५००१ रुपये, तृतीय क्रमांक २००१ रुपये व चतुर्थ क्रमांक १००१ रुपये बक्षीस ठेवण्यात आले असून चारही विजेत्या संघांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

याशिवाय उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट लिफ्टर, उत्कृष्ट नेटमन यांच्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी योगेश गावडे ९२८४४८८८११, सुमन गावडे ९४२०११०९८०, अमेय परब ८४११८५०१४३ येथे संपर्क करण्याचे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत उपस्थित राहणाऱ्या संघाना प्रवास भत्ता दिला जाणार नाही. तसेच सायंकाळी ६ नंतर उपस्थित राहणाऱ्या संघाना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोजक मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!