लोखंडी रॉड, हॉकी स्टिक ने अज्ञातांकडून मारहाण
मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते तथा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी चार अज्ञातांनी मिळून हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी लोखंडी रॉड तसेच हॉकीस्टिकचा वापर केल्याचा केल्याची माहिती पुढे येत आहे. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉक करत असताना शिवाजी पार्कमध्ये त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याचा मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. शिवाजी पार्क पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ऐनअधिवेशन काळात हा हल्ला झाल्या असल्यामुळे अधिवेशनात देखील आज या हल्ल्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.












