मुलींच्या खो-खो या खेळ प्रकारात दोन्ही गटात लोरे-हेळेकरवाडीच्या मुलींची बाजी
वैभववाडी (प्रतिनिधी) : बालकला क्रीडा महोत्सव व ज्ञानी मी होणार हा कार्यक्रम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग दरवर्षी राबविते. या ही वर्षी दि. ०१ मार्च ते ०३ मार्च या कालावधीत डॉन बॉस्को हायस्कूलच्या भव्य पटांगणावर या विविध स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत खो-खो या खेळ प्रकारात मुलींच्या मोठ्या गटांमध्ये केंद्रशाळा लोरे हेळेवाडी या संघाने देवगड संघाचा पराभव करत विजेते पद पटकाविले.
या संघात आदिती मांडवकर, दिव्या मांडवकर, साक्षी मांडवकर, माधवी सावंत, अंतरा जाधव, तन्वी बोरसे, अक्षता दरडे, गौरी गोरुले, सोनाक्षी बाणे, रोहिणी मांजलकर, शमिका गोरूले या विद्यार्थिनींचा समावेश होता. विशेष म्हणजे दि. २ मार्च रोजी झालेल्या खो खो या क्रीडा प्रकारात मुलींच्या लहान गटात देखील देवगड संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या संघात आदिती योगेश मांडवकर, समीक्षा डोंगरे, आर्या रासम, अनिता नेमन, श्रावणी नावळे, श्रावणी रावराणे, रिद्धी पाटेकर, आर्या गोसावी, तिर्था गुरव, रिया जाधव या मुलींचा लहान गटातील संघात समावेश होता.
या दोन्ही संघांना कोलते सर, गौतम तांबे सर, आसवले सर या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रम प्रसंगी कदम सर,गाडीकर सर,येनगे सर,संदीप शेळके सर, सौ.अश्विनी मांडवकर,दिगंबर पानकर आदी शिक्षक उपस्थित होते. या दोन्ही संघाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. विजयी संघाचे व्यवस्थापन समिती लोरे हेळेवाडी व लोरे नंबर २ या गावातर्फे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.