सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शेकडो उमेदवार डी एड पदविका घेऊन बेरोजगार आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री अपयशी ठरले आहेत त्यांनी मनात घेतले तर हा प्रश्न मार्गी लागु शकतो. परन्तु ते मनावर घेत नाहीत हीच मोठी समस्या आहे असे यावेळी अमित सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी आंदोलनाला भेट दिली. त्यांना अमित सामंत यांनी चांगलेच धारेवर धरले, आपण जिल्ह्यातील स्थिती योग्यरीतीने शासनाला कळविणे आवश्यक आहे. मात्र आपण केवळ दिलेली निवेदने शासनाला पाठउन पोस्टमेनची भूमिका बजावत आहत. त्यामुळे येथे आंदोलन करणाऱ्या एकही उमेदवाराला काही धोका झाल्यास तुमच्यासह शिक्षण मंत्री यांना जबाबदार धरले जाईल. असा इशारा अमित सामंत यांनी यावेळी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकपद भरतीत स्थानिक डी एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट सामावून घ्यावे. या मागणीसाठी डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. आज शरद पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत व अर्चना घारे यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील बेरोजगार आंदोलन करीत आहेत आणि शिक्षण मंत्री आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत ही शोकांतिका आहे त्यांनी जिल्ह्यातील तरुणांना न्याय देण्यासाठी सकाराम सकारात्मक भूमिका घेत शासन धोरण लवचिक करावे अशी अपेक्षा आहे या उमेदवारांची वय उलटून जात असल्याने ही त्यांना शेवटची संधी आहे .त्यामुळे त्यांना न्याय मिळऊन देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरु त्यामध्ये कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षीय नेत्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन केले.