सी ए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मृणाल ने मिळवलंय सुयश
कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे फणसनगर येथील मृणाल मोहन कुंभार हिने पहिल्याच प्रयत्नात अत्यंत काठिण्य पातळीच्या सी ए परीक्षेत सुयश मिळवत चार्टर्ड अकाउंटंट पदाला गवसणी घालत वरवडे गावचे नाव उज्ज्वल केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटस ऑफ इंडियाच्या चार्टर्ड अकौंटंट या फायनल परीक्षेत 600 पैकी 301 गुण मिळवत सुयश प्राप्त केले. मृणाल ही प्राध्यापक साहित्यिक मोहन कुंभार यांची सुकन्या आहे. मृणाल च्या या यशाबद्दल स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे च्या वतीने वरवडे गावचे युवा उद्योजक अचित कदम यांच्या वतीने भेटवस्तू ,शाल, पुष्पगुच्छ देत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी पं स सभापती प्रकाश सावंत, युवा उद्योजक अचित कदम, माजी उपसरपंच आनंद घाडीगांवकर, सोहेल खान, मंदार मेस्त्री, सागर राणे, ओंकार मेस्त्री आदी उपस्थित होते. मृणाल हीने मुंबई विद्यापिठातून एम कॉम चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये सी ए परीक्षेत सुयश मिळवले.मृणाल ने यूपीएससी नंतर ची देश स्तरावरील काठिण्य पातळीची सी ए परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे वरवडे गावचे नावसुद्धा उज्वल केल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली.












