पावसाने घर कोसळलेल्या वेंगुर्लेमधील गरीब विधवा मच्छिमार महिलेला भाजपाचा मदतीचा हात

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक योगदान देत उचलला वाटा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : संततधार कोसळणाऱ्या पावसाने वेंगुर्ले नवाबाग भागातील विद्या दत्ताराम आरोंदेकर या गरीब मच्छिमार महिलेचे घर कोसळल्याने कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. शासकीय प्रक्रियेतून मदत मिळेपर्यंत तातडीने तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्यासाठी डागडुजी करणे गरजेचे होते. भाजपाचे वेंगुर्ले तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा पदाधिकारी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मदतीसाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले.

नेहमीच लोकांना अडीअडचणीत मदतीला धावणारे संवेदनशील नेतृत्व असलेले भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कानावर हा वृत्तांत गेल्यावर त्यांनी तातडीने प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांच्याशी संपर्क साधून या कामात आपल्याकडून आर्थिक स्वरूपात काही मदत देत असल्याचे सांगितले. त्यानुसार भाजयुमोचे पदाधिकारी ही आर्थिक मदत घेऊन प्रसन्ना देसाई यांच्याकडे पोहोचले. देसाई यांनी भाजयुमो पदाधिकाऱ्यांसमवेत ही मदत तातडीने त्या मच्छिमार महिलेकडे सुपूर्द केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ जिल्हा पदाधिकारी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या सेवाभावी वृत्तीने गोरगरिबांच्या मदतीसाठीच्या धडपडीचे आणि भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संवेदनशील वृत्तीने तातडीने केलेल्या मदतीचे नवाबाग परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. सदर मच्छिमार महिलेने याप्रसंगी विशाल परब यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस,तालुका सरचिटणीस बाबली वांयगणकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, सरपंच संघटना अध्यक्ष पपू परब,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायगणकर,सायमन आल्मेडा,पुंडलिक हळदणकर,मनोहर तांडेल,गौरेश खानोलकर व कार्यकर्ते उपस्थित आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!