ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांनी खूप चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील महिलांचा विचार करताना त्यांनी खऱ्या अर्थाने विकास घरोघर पोहोचविला आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखणारा जिल्हा बँकेचे हे अध्यक्ष आहेत, असे गौरवोद्गार आमदार निरंजन डावखरे यांनी काढले. जिल्हा बँकेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मनीष दळवी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आम.निरंजन डावखरे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संचालक ऍड.प्रकाश बोडस, समीर सावंत, सौ प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगावकर, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी, विद्याधर परब, नीता राणे, प्रकाश मोर्यें ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हा बँक 6000 कोटी पर्यंतच्या उलाढालीवर येऊन पोचली आहे. त्याचबरोबर गेल्या अडीच वर्षात या बँकेने बरेच मोठ मोठे मापदंड ओलांडले आहेत. याचं खरं श्रेय जर कुणाचं असेल तर ते मनीष दळवी यांचे आहे. अध्यक्ष पद स्वीकारल्यापासून गेल्या दोन ते अडीच वर्षात या माणसाने आपला पूर्ण वेळ देऊन या बँकेच्या प्रगतीकडे लक्ष दिले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याप्रमाणे काम करतील त्याप्रमाणे काम करणारा मी पाहिलेला हा पहिला अध्यक्ष आहे. आठ आठ दहा दहा तास बँकेत थांबून बँक आणि जनता यांच्यासाठी काम करणारा असा अध्यक्ष मिळाला आहे. त्यामुळे बँकेची खरी प्रगती झाली आहे. बॅकेच्या कर्ज वाटपा सोबतच कर्ज वसुली वरही बारीक लक्ष ठेऊन ती १०० टकके व्हावी यासाठीही प्रयत्न केले. त्याचबरोबर सेवासंस्था मजबूत करण्याकडे लक्ष देत प्रत्येक सेवा संस्थेला भेट देऊन त्यांच्या मजबुतिकडे ही ध्यान दिले. त्यामुळे जिल्हा बँक बरोबरच सेवा संस्थाही सबळ होऊ शकल्या असे मत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी व्यक्त केले.
राजकारणात किंवा समाजकारणात काम करणे हे तेवढे सोपे नाहीय. त्यासाठी खूप कष्ट मेहनत आणि सातत्य लागतं. आज राजकारणात गेलो. उद्या लगेच गाडी घेतली परवा नेता झालो असं होत नाही. त्यासाठी खूप कष्ट असतात. सहकार क्षेत्रात आणि इतर जिल्हा परिषद पंचायत समिती यांमध्ये खूप मोठा फरक आहे. सहकार क्षेत्रात काम करताना एक रुपयाची जरी गडबड झाली तरी ती पन्नास वर्षे तशीच कागदावर राहते. त्याचप्रमाणे एक रुपयाचा फायदा झाला तरी त्याच श्रेय कायम राहते. असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची प्रगती या प्रगती बरोबरच जनतेची प्रगती व्हावी यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या अध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर त्याला न्याय देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. यामध्ये संचालकांसह सर्व नेतेमंडळी आणि आपणा सर्वांचं सहकार्य लाभत आहे. या सहकाराच्या जोरावरच जिल्हा बँकेची उत्तरोत्तर प्रगती साधने शक्य होत आहे. असे सांगताना या जिल्ह्यातील जनतेच्या सहकार्याने त्यांच्या प्रगती सोबतच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उलाढाल 8000 कोटी पर्यंत न्यायची आहे. असा मानस जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी बोलताना व्यक्त केला. तर आपला वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानत सर्वांच्या शुभेच्छाही स्वीकारल्या.