वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश

भाजपा मच्छिमार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी किरण तांडेल यांना नियुक्ती

भाजपा आसोली – न्हैचीआड बुथ अध्यक्ष पदी विश्राम विजय धुरी यांची निवड

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्लेत भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले असुन आठवड्याभरात उभादांडा – कुर्लेवाडीतील पक्षप्रवेशा नंतर सागरतीर्थ ग्रामपंचायत हद्दीतील टांक येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले कि भाजपा विरोधात विरोधी पक्ष नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे , परंतु मोदी सरकार ने केंद्रात व महायुती सरकार ने राज्यात विकासाचा डोंगर उभा केलाय हे निर्विवाद सत्य आहे . हे विकासात्मक कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे. सरकारने समाजातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेवून विविध योजना आणल्या , मोदी सरकारने गोरगरीब जनतेसाठी दरमहा मोफत धान्य , तसेच राज्य सरकार ने महीलांना एस् टीत ५०% प्रवासभाडे सुविधा , शेतकऱ्यांना शुन्य विज बिल , मुलींना मोफत उच्च शिक्षण , महीलांसाठी लाडकी बहीण योजना, बचत गटांसाठी रिव्हाॅल्व्हिंग फंड , ग्रामरोजगार सेवकांना ८ हजार रु.अनुदान , महीलांसाठी ३ सिलेंडर मोफत , ६५ वर्षावरील महीला व पुरुषांना श्रावण बाळ योजना व राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत १५०० रु प्रती महा , ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.मध्ये मोफत प्रवास , यासारख्या हजारो योजना व तेवढ्याच प्रमाणात विकास कामांचा डोंगर उभारुन महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असताना वसुली सरकारला पुन्हा सत्तेत थारा नाही हे आपण सर्वांनी मतदान रुपाने दाखवुन दिले पाहिजे , असे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , आसोली उपसरपंच संकेत धुरी , सागरतीर्थ उपसरपंच सुषमा गोडकर , तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्तिकेंद्र प्रमुख महादेव नाईक व जगन्नाथ राणे , बुथ प्रमुख पांडु फोंडनाईक व बाळु वस्त , संदिप देसाई व बाळु फटनाईक उपस्थित होते. यावेळी आश्वीनी तांडेल , राजाराम तारी , दत्तात्रय वस्त , सखाराम देवजी , रामकृष्ण बागकर , शमिका गोडकर , प्रतिक्षा गोडकर , श्रेया गोडकर , संजना नाईक , रुपेश तांडेल, घाब्रु फर्नांडिस , नामदेव गवंडे , संतोष कावले , चेतन बागकर इत्यादींनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी अनिल बागकर , यशवंत फटनाईक , मोहन कोचरेकर , प्रदिप नाबर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!