पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांकरीता सोलर हायब्रिड ईन्व्हर्टर केले मंजुर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सौरक्रांतीला चालना दिली -प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा, सिंधुदुर्ग
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे कृषी पंप सौर उर्जेवर चालविण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाअभियान – पीएम कुसुम , घरोघरी छतावर सौर उर्जा निर्मिती पॅनेल्स बसवुन वीज निर्मितीसाठी रुफ टाॅप सोलर योजना, सोलर पार्क उभारणी , संपुर्णपणे सौर उर्जेवर शहर चालवुन सोलर सिटी विकसित करणे अशा विविध योजना मोदी सरकारने हाती घेतल्या आहेत . त्यामुळेच संपुर्ण देशभर बदल होत आहेत . त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सिंधुदुर्गात पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांकरीता सोलर हायब्रिड इन्व्हर्टर मंजूर केले आहेत. यामुळे माध्यमिक शिक्षण संस्थेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . बर्याच माध्यमिक शाळांमध्ये इन्व्हर्टर नसल्यामुळे विजपुरवठा खंडित झाल्यानंतर कार्यालयीन कामकाज करणे कठीण होत होते , परंतु आता इन्व्हर्टर ची सुविधा मंजूर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
वेंगुर्ले तालुक्यातील खालील शाळांना हायब्रिड ईन्व्हर्टर मंजुर
१) अणसुर पाल हायस्कूल , अणसुर.
२) वेंगुर्ला हायस्कूल , वेंगुर्ला .
३) श्री देवी सातेरी हायस्कूल , वेतोरे .
४) बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय , वेंगुर्ले .
५) आर.के.पाटकर हायस्कूल आणि आर.सी.रेगे ज्यु.काॅ.वेंगुर्ला
६) न्यु इंग्लिश स्कूल उभादांडा .
७) अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर , परुळे
८) कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल , आडेली
९)आसोली हायस्कूल , आसोली
१०) दाभोली हायस्कूल , दाभोली
११) न्यु.इंग्लिश स्कूल , मातोंड
१२) गुरुवर्य बावडेकर विद्यालय अँड बी.एम.काॅलेज , शिरोडा
१३)डाॅ. आर.डी खानोलकर हायस्कूल , मठ
१४) श्री माऊली विद्यामंदिर , रेडी .
रविवार दिनांक ६ / १० / २४ रोजी सकाळी ११ – ०० वाजता कणकवली काॅलेज येथे कणकवली , मालवण , देवगड , कुडाळ व वैभववाडी या तालुक्यातील माध्यमिक शाळांना वितरित करण्यात येणार आहेत . तसेच सोमवार दिनांक ७/१०/२४ रोजी आर.पी.डी.हायस्कूल , सावंतवाडी येथे वेंगुर्ले , सावंतवाडी, दोडामार्ग या तिन तालुक्यातील माध्यमिक शाळांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सोलर हायब्रिड ईन्व्हर्टर चे वाटप करण्यात येणार आहे .