उभादांडा ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे जनता दरबारात वेधले लक्ष
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलच्या विद्यार्थ्याची रस्ता नसल्याने गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करावा. अशी मागणी उभादांडा ग्रामस्थांनी आजच्या जनता दरबारात केली. तर याबाबत लक्ष वेधण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृहाबाहेर विद्यार्थ्यांसमवेत धरणे आंदोलन केले.
सिंधुदुर्गनगरी येथे गेले तीन दिवस पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी सावंतवाडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला , याच मतदारसंघातील उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेला रस्ता उपलब्ध करून द्या या मागणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र याबाबत ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले आहे.
आणि जो पर्यंत शाळेसाठी रस्ता मिळत नाही तो पर्यन्त आंदोलन मागे घेणारं नसल्याचा पवित्रा उभादांडा ग्रामस्थानी घेतला . यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांची समस्या जानून घेत, हा विषय न्याय प्रविस्ट असल्याने त्यातून काय मार्ग काढता येईल का? यासाठी संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री चव्हाण यांनी दिल्या. मात्र ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने नाराजी व्यक्त केली.