वैभववाडी (प्रतिनिधी) : काल, राजकोट येथील महाराज्यांच्या पुतळ्याचे विखंडित प्रकरणामुळे, संपूर्ण मालवण मध्ये बंद पुकारून नागरिकानी काळा दिवस साजरा केला.आणि ,त्यात आदित्य ठाकरे ही सामील झाले होते . तसेच वस्तुस्थिती पाहणी करीता, दोन विरोधी पक्ष नेत्या सोबत, त्यांचा राजकोट किल्ल्यावर चा दौरा पूर्व नियोजित होता.त्या ठिकाणी, जाणूनबुजून स्वतःचे पोलिस संरक्षण घेत जाऊन राणे पिता पुत्रांनी, जो काही धिंगाणा काल घातला , ते मताचा काळाबाजार करणारे ,कोकणी जनतेलाही लाजिरवाणे झाला आहे.यांना आपले प्रतिनिधी म्हणायला सुद्धा आता कोणत्याही सुशिक्षित लोकांना धजवणार नाही. खरतर, सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा, ज्यांनी डोबल आणि मोदी ना डोक्यावर नाचवले , त्यांनी आता महाराजा च्या पुतळ्या साठी मग, नेव्ही कडे का बोट दाखविले ? .हा खरा सवाल आहे .ही, ” दोगलापन “ची राजनिती जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. आताच वाटते , महाराजांना सुद्धा यांच्याकडून न्याय मिळणार नाही . कोकणी जनतेनी हे सर्व लक्षात ठेवून , आपल्या मताचा काळाबाजार आधी थांबवावा, म्हणजे असा ‘काळा दिवस” पुन्हा त्यांना ह्याची देही याची डोळा तरी पाहायला मिळणार नाही असे शिवसेना उबाठा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी म्हटले आहे.