डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेत जनिकुमार कांबळे यांचा प्रथम क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ.बाबसाहेब आंबेडकर साहित्यधारा इतिहासाचे नवे पर्व अर्थात साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र शाखा रत्नागिरी यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिनी ‘उंच उंच गगणात तिरंगा‘ या विषयावर ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथील रहिवासी असलेले भीम बुद्ध गीतांचे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कवी गायक श्री दत्ताराम देऊ कांबळे उर्फ जनीकुमार कांबळे यांच्या काव्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मूळ गाव कुसुर ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्ग येथील रहिवासी असलेले जनीकुमार कांबळे यांनी सन १९६७ पासून आपल्या गायन कलेचा छंद जोपासलेला असून कवाली गायन पार्टीच्या माध्यमातून भीम बुद्धांची गीते गाऊन समाज प्रबोधन केलेले आहे.त्यांची अनेक गायनाची पुस्तके प्रसिद्ध झालेली असून वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर, दिवंगत कवी आ.सो शेवरे, प्रा.ए वाय जाधव लेखक बी एस जाधव यांची प्रस्तावना व शुभसंदेश मिळालेले आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले असून सध्या ते म.रा.विद्युत मंडळ सिंधुदुर्ग येथून सेवानिवृत्त होऊन पूर्णवेळ भारतीय बौध्द महासभेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्गदर्शक व प्रचारक म्हणून काम करत आहेत.

७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेत एकूण २७ स्पर्धक सहभागी झाले होते. तर ‘उंच उंच गागणात तिरंगा‘ या देशभक्ती विषयावरील गीतात बलिदानाचे रूप या जनीकुमर कांबळे यांच्या स्वरचित काव्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून द्वितीय क्रमांक खेड रत्नागिरी येथील कवी संदेश गमरे यांच्या ‘तिरंगा भारताची शान’ या काव्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.तर कवी प्रवीण जाधव यांच्या ‘कफन तिरंगी फडकतो ‘या काव्याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.तसेच उत्तेजनार्थ म्हणून कवी संगम कासारे व कवी रत्नाकर बाबुराव पाटील यांच्या काव्यांची निवड झाली आहे.

तर या काव्य स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मनोज जाधव व संस्थापिका भावना खोब्रागडे यांनी केले होते. तर परीक्षण गौतम कांबळे (सांगली) यांनी केले. लवकरच या स्पर्धेतील सर्व विजेत्या कवी स्पर्धकांना डॉ. बाबसाहेब आंबेडकर साहित्य मंच महाराष्ट्र राज्य शाखा रत्नागिरी यांच्या वतीने गौरवीन्यात येणार असल्याची माहिती जनिकुमार कांबळे यांनी दिली.

error: Content is protected !!