कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ व ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संयुक्त विद्यमाने 29 ऑगस्ट रोजी कणकवली पटवर्धन चौक येथे सर्विस रोडवर मोठ्या खड्ड्यात कणकवलीतील रिक्षा स्टॅन्ड क्रमांक दोन या ठिकाणी खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या खड्ड्यामुळे शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, पादचारी यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यातील पाणी गाडीचे चाक गेल्यानंतर जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते. व बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थी व पादचारी यांचे कपडे चिखलाच्या पाण्याने खराब होत होते.
संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर सर्विस रोडवर पडलेले खड्डे भरून लोकांना होणारा त्रासातून मुक्त करावे. असे समस्त नागरिकांची मागणी आहे.
रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करताना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका सदस्य तसेच रिक्षा चालक भरत तळवडेकर, संजय तळवडेकर, पारकर, बाणे, रिक्षा चालक-मालक हजर होते.