कामगार यांना 90 दिवस प्रमाण पत्र न दिल्यास होणार ग्रामसेवक यांच्यावर होणार कारवाई
श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना 90 दिवस प्रमाणपत्र देत नसल्याने तसा पाठपुरावा जिल्हा व मंत्रालयीन पातळीवर निवेदन देण्यात आले होते व जनता दरबार मधेही विषय मांडण्यात आला होता. सदरील विषयात सर्व संघटना, कामगार यांचा विचार करून जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांनी आदेश काढून तसे पत्र सर्व गटविकास अधिकारी यांना दिलेले आहे.
तसेच वरील पत्र दाखवून पण ज्या गावातील ग्रामसेवक आमच्या राज्य संघटनेचा निर्णय झाला नाही असे सांगून बांधकाम कामगारांना प्रमाणित दाखला देण्यास नकार देत आहेत किंवा टाळाटाळ करत असतील तर अशा कामगारांनी श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष – प्राजक्त चव्हाण यांच्याशी संपर्क करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश असून सुद्धा ग्रामसेवक सही देत नसतील तर त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना जाब विचारण्यात येईल.