राजकोट शिवपुतळा दुर्घटनेची उपमुख्यमंत्री पवार यांनी केली पाहणी
मालवण (प्रतिनिधी) : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनास्थळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी भेट देत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे व राष्ट्रवादी क्रॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ना. अजित पवार यांनी पाहणी करत आवश्यक त्या सुचना प्रशानाला केल्या त्यानंतर निघताना ना. अजित पवार यांच्या कारचे स्टेरिंग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हाती होते. यानिमित्ताने अबिद नाईक अजित पवार यांचे सारथी झाल्याचे दिसून आले.