कारचालक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण जखमी
मृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल
देवगड (प्रतिनिधी) : देवगड नांदगांव मार्गावर जामसंडे खाकशीतिठा वळणानजिक रिक्षा आणि स्विप्ट कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात नाडण येथील रिक्षाचालकाचा मृत्यु झाला.हा अपघात शनिवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वा.सुमारास झाला.या अपघातात स्विप्ट कारचालक देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रिक्षाचालक अभिजित कृष्णा पुजारे (३५) रा.नाडण येथून शनिवारी सकाळी ९ वाजता तळवडे येथे प्रवाशी भाडे सोडण्यासाठी जात होता.त्याचा रिक्षेमध्ये सौ.रचना राजेंद्र धुरी(४०) तळवडे धुरीवाडी व त्यांची छोटी मुली होती.तळवडे येथे पोहचविण्यासाठी तो त्यांना घेवून जात होता.दरम्यान सकाळी ११.३० वा.सुमारास देवगड नांदगांव मार्गावर खाकशी तिठानजिक वळणावर समोरून येणाèया स्विप्ट कारला रिक्षेची जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात रिक्षाचालक अभिषेक यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली तर रिक्षेमधील रचना धुरी व त्यांच्या छोट्या मुलीला किरकोळ दुखापत झाली.अपघातातील स्विप्ट कार ही देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण यांची होती.ते साळशी येथील कार्यक्रम आटोपून देवगड येथे येत असताना हा अपघात झाला.या अपघातात त्यांचा पायाला दुखापत झाली.या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालक अभिषेक पुजारे यांला प्रथम उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर उपचारासाठी ओरोस जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले मात्र गंभीर जखमी असलेल्या रिक्षाचालक अभिषेक यांचा उपचार सुरू असतानाच सायंकाळी निधन झाले.या अपघाताची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून रस्त्याचा विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून समोरून येणाèया चार चाकी वाहनास धडक देवून रिक्षेतील प्रवाशी, स्वत:चा दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरूध्द देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दु:खद घटना.