कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची अवैध दारू बाळगल्याप्रकरणी कणकवली शिवाजीनगर येथील तृप्ती तुळशीदास हुन्नरे ( वय 49 ) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके, हवालदार किरण देसाई यांनी 13 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केली. एलसीबी चे पोलीस हवालदार किरण देसाई यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तृप्ती हुन्नरे हिच्या घराबाहेर 9 हजार 600 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. याबाबत हुन्नरे हिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.