तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला निःशुल्क
रविवार 12 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणार तपासणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील सुप्रसिद्ध डॉ. नागवेकर हॉस्पिटलच्या वतीने किडनी स्टोन, पित्ताशयातील स्टोन तसेच स्वादुपिंडातील स्टोन आजारावर मोफत तपासणी आणि सल्ला शिबीर रविवार 12 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ विठ्ठल पटेल, युरोसर्जन डॉ. चेतन कुलकर्णी, गॅस्ट्रोसर्जन डॉ.मयूर नागवेकर यांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळणार आहे. तसेच ओजीडी स्कोपी सोनोग्राफी, व दुर्बिणीने तपासणी माफक दरात केली जाणार आहे. किडनी स्टोन व प्रोस्टेट चे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत करण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून मोबाईल नं 9422054859 आणि 9852108108 वर करावी.