सिंधुदुर्ग महिला पोलीस तृप्ती मुळीक ला 3 दिवस पोलिस कोठडी

काेल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी हे कुटुंबीय समवेत राहतात. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करणी काढण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने अशी जवळपास ८४ लाख रुपयांची लूट एका भोंदू बाबाच्या टोळीनं केली होती. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून मुख्य संशयित दादा पाटील महाराज यांच्यासह नऊ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान यातील मुख्य संशयित पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिला जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा सिंधुदुर्ग इथून ताब्यात घेतलं होतं. आज तृप्ती मुळीक हिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

error: Content is protected !!