खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण प्राथमिक विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हवूपकरम राबविण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा नुकताच तळरे प्रभागातील शेर्पे व खारेपाटण या केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख संजय पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा स्वछ सुंदर शाळा या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळा तसेच मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या खारेपाटण गावातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेने मिळविलेले यश हे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर व त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन केलेल्या परिश्रमाचे हे सांघिक फळ असल्याचे यावेळी केंद्रप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. त्यांनीं शाळेचे व शाळेतील सह शालेय उपक्रमांचे कौतुक करून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खारेपाटण केंद्र शाळेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला कुरांगवने खैराटवाडी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद बागडी , कुरंगवणे भंडारवाडी शाळेचे शिक्षक सखाराम खरात, चिंचवली मधलीवाडी शाळेचे शिक्षक गोरक्षनाथ गायकवाड,शिडवणे कोणेवाडी शाळेचे शिक्षक कुडतरकर, शिडवणे शाळा नं. १ चे शिक्षक प्रवीण कुबल, रामेश्वर नगर खारेपाटणचे शिक्षक संतोष धुळप, नडगिवे नं. १ शाळेच्या शिक्षिका प्रभा आकीवटे, खारेपाटण टाकेवाडी शाळेचे शिक्षक संतोष तेरवणकर, खारेपाटण काझीवाडी उर्दू शाळेचे शिक्षक इरफान सारंग, खारेपाटण बंदरवाडी उर्दू शाळेच्या शिक्षिका मुल्ला आदी खारेपाटण व शेर्पे केंद्रातील प्रमुख मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.