कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामपंचायत विकास कामात सहभाग करून घेणेकरिता आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) योजनेची अंमल बजावणी करणेकरिता तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीची तालुका स्तरीय समितीने मुल्यांकण केले होते. या मुल्यांकणामध्ये १०० गुणांपैकी ९७ गुण मिळवून सदर योजनेमध्ये ग्रामपंचायत साळिस्ते अव्वल ठरली आहे. सदर आदेश मां. मुख्य कार्यकारी अधिकारी, जी.प. सिंधुदुर्ग याचे आदेश प्राप्त झालेले आहे. याबाब ग्रामपंचायत साळिस्ते चे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे.
स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त करण्यासाठी साळिस्ते गावाचे सरपंच, प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच, जितेंद्र गुरव, ग्रा.पं. सदस्य, मंगेश कांबळे, गिरीश कांबळे, प्रेमलता गुरव, मानसी बारस्कर, हर्षदा ताम्हणकर, तेजल कुडतरकर, ग्रामपंचायत अधिकारी विशाल वरवडेकर, सर्व ग्रा.पं कर्मचारी यांनी चांगले योगदान दिले, तासेच पोलिस पाटील गोपाल चव्हाण, तंटामुक्त गाव अध्यक्ष सुरेश साळिस्तेकर, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच गावातील सर्व आजी माझी सरपंच, उपसरप, ग्रा.पं सदस्य, सर्व ग्रामस्थ व बचत गटाचे सहकार्य लाभले.