वन्यजीव सप्ताहनिमित्त फोंडा वनपरिमंडळच्या वतीने स्वच्छता मोहीम

फोंडाघाट पर्यटन स्थळ परिसर करण्यात आला चकाचक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वन्यजीव सप्ताहनिमित्त वन परिमंडळ फोंडा व सर्प इंडिया चे सदस्य ,निसर्ग मित्र यांच्या संयुक्त सहभागाने फोंडाघाट परिसरातील पर्यटन क्षेत्र ठिकाणी स्वच्छता मोहिमेचा मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत फोंडाघाट मार्गातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेला सगळा कचरा, प्लास्टिक बाटल्या तसेच वेष्टन गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. फोंडा वनपाल धुळू कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फोंडा कार्यक्षेत्रातील सर्व निसर्ग मित्र सर्पमित्र यांना जलद बचाव कार्याबाबत फोंडा वनपाल धुळू कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी वनरक्षकअतुल खोत,अंकुश माने,जितेंद्र पोर्लेकर,शुभम पाटील ,रोहित सोनगेकर वनसेवक बबन बागवे, सुधा सावंत,वाहन चालक सागर ठाकूर, निसर्ग मित्र मंदार राणे,मयूर राणे ,सत्यवान चव्हाण ,बंटी पाटील,मंगेश ,विठ्ठल बिडयेसदर उपस्थित होते.

error: Content is protected !!