नागरिकांकडून समाधान व्यक्त
वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे. नुकताच राज्य शासनाने तसा आध्यादेश काढला आहे. या ग्रामीण रुग्णालयाचा लाभ उंबर्डे सह परिसरातील 30 महसुली गावांना होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे 50 वर्षांपूर्वी हरिभाऊ दळवी सुभेदार श्रीपतराव दळवी यांच्या प्रयत्नाने उंबर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली होती. या आरोग्य केंद्राचा लाभ उंबर्डे परिसरातील गावांना होत होता. मात्र या ठिकाणी होत असलेल्या उपचारावर मर्यादा असल्यामुळे उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी सरपंच शेरपुद्दीन बोबडे यांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी विशेष ग्रामसभा घेऊन रुग्णालयासाठी शासनाकडे प्रस्ताव करून मागणी केली होती. गेल्या चार वर्षात प्रस्तावामध्ये त्रुटी काढून तीन वेळा प्रस्ताव नाकारला घेता गेला होता. तरीही प्रस्तावातील त्रुटी दूर करून सातत्याने प्रस्तावाचा पाठपुरावा केल्यामुळे १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन होऊन ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा शासनाच्या निर्णयान्वये देण्यात आला. याचा लाभ उंबर्डे गावासह उंबर्डे परिसरातील 30 महसुली गावांना होणार आहे या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्पदंश उपचार,हृदय रोगावरील उपचार, पॅथॉलॉजी लॅब, आय सी यु दर्जाची व्यवस्था, अपघात विभाग,दंतचिकित्सा, नेत्र तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रसूती, कान नाक घसा तपासणी, आदी सर्व आजारावर शासनामार्फत मोफत उपचार होणार आहेत. रुग्णालयासाठी अद्यावत इमारत व इतर कामांसाठी 30 ते 40 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
उंबर्डे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे यासाठी आमदार नितेश राणे, माझी सभापती नासिर काझी, माजी सरपंच बोबडे, सूर्यकांत मुद्रस, चंद्रकांत तावडे, माई सरवणकर,परशुराम शिरसाट,मुख्यमंत्री ओएसडी मारुती साळुंखे, अप्पर सचिव कविता पिसे,अनिल खोचरे आरोग्य भवन मुंबई,महेश ठाकूर,
सरपंच वैभवी दळवी, उपसरपंच अजीम बोबडे यांनी प्रयत्न केल.