वांग्याची, हरभऱ्याची आणि कांद्याची पातिचा स्वतः राहुल गांधी यांनी बनवला स्वयंपाक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज दि. 5 ऑक्टोबर 2024 पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे.
राज्यात लवकरचं विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असून, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी वाशिमच्या तर, राहुल गांधी कोल्हापुरमध्ये आहेत. राहुल गांधीच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापुरात पोहचल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी न जाता उचगावमधील टेम्पो चालक आणि काँग्रेस कार्यकर्ता असलेल्या अजित संधे घरी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्याच्या घरी सुमारे 45 मिनिटे गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर, संबंधित कुटुंबियांसाठी स्वतःच्या हाताने मराठमोळे पदार्थ बनवून खाऊ घातले.
राहुल गांधीच्या भेटीनंतर आपल्याला अत्यानंद झाल्याचे संधे यांनी सांगितले. तर, त्यांच्या पत्नीने सांगितले की, राहुल गांधींनी आमच्या घरी भेट दिली यात आनंद तर आहेच पण, सर्वाधिक आनंद त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले पदार्थ आम्हाला खाऊ घातले आणि स्वतःदेखील खाल्ले. राहुल गांधींनी काय बनवले असे विचारले असता संधे यांच्या पत्नीने सांगितले की, त्यांनी वांग्याची, हरभऱ्याची आणि कांद्याची पात बनवली. हे सर्व बनवता आमच्या किचना संपूर्ण ताबा राहुल गांधी यांच्याच हातात होता असे त्या म्हणाल्या.