रक्तदान शिबीरासारखे सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद- डॉ. पल्लवी सुरवसे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये गरबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमासोबत रक्तदान शिबीरासारखे सामाजिक उपक्रम राबवुन नवदुर्गा युवा मंडळ समाज सेवेचा आदर्श निर्माण करीत हे निश्चितचं कौतुकास्पद आहे असे गौरवोद्वार जिल्हा रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. पल्लवी सुरवसे यांनी सार्वजनिक नवरात्र उत्सव निम्मित नवदुर्गा युवा मंडळाने नवीन कुर्ली येथील आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटनवेळी काढले.

कार्यक्रम उद्घाटनवेळी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांनी नवदुर्गा युवा मंडळाने सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमात रक्तदान शिबीर उपक्रम राबवुन यशस्वी नियोजन केले, मंडळाचे रक्तदान शिबीर व अन्य सामाजिक उपक्रम निश्चितचं कौतुकास्पद व समाजशील असून मंडळाने भविष्यात युवा पिढीच्या माध्यमातून असे उपक्रम राबवावे ग्रामस्थ म्हणुन आमचे नेहमीच सहकार्य असेल, अशी ग्वाही दिली.

या रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटनवेळी जिल्हा रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. पल्लवी सुरवसे, जिल्हा रक्तपेढी विभाग सिंधुदुर्ग कर्मचारी प्रांजली परब, नेहा परब, जोसेफ पिंटो, विजय निरुखेकर, गणपत गाडगे, असलम शेख,नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, सचिव अतुल डऊर,अमित दळवी, प्रदीप आग्रे, विजय आग्रे, सचिन साळसकर, प्रशांत दळवी,राजेश हुंबे, विजय आग्रे, अनिल दळवी,सचिन परब, कल्पेश कदम,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,कृष्णा परब, योगिता मडवी, प्रकाश दळवी, प्रकाश आग्रे, पांडुरंग कोलते, शिवाजी चव्हाण,अशोक पिळणकर, पांडुरंग चव्हाण,चंद्रकांत मर्गज, फोंडाघाट येथील मारुती मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सदस्य, गावातील ग्रामस्थ यांनी रक्त संकलन करुन शिबीर यशस्वी करण्यास सहकार्य केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार प्रशांत दळवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!