बाळगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी आयोजित जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा

आचरा येथील दांडीया स्पर्धेतसमर्थ ग्रुप कुणकेश्वर, प्रथम

आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ गृप कुणकेश्वर यांनी मिळविला. द्वितीय नवदुर्गा गृप किंजवडे, तर तृतीय आचरा पिरावाडी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ सिद्धिविनायक ग्रुप नांदगाव, कुणकेश्वर पावणाई गृप, वेंगुर्ला, नाडण गृप देवगड यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण मनस्वी कुबल, सागर सारंग यांनी केले. स्पर्धेचे बक्षिस वितरण देवस्थान सचिव संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर यांच्या हस्ते केले गेले. यावेळी वामन आचरेकर, बबन शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेश शटये,रामदास आचरेकर, मंदार आचरेकर, ओमकार आचरेकर यांसह बहुसंख्य बालगोपाळ मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन राजेश भिरवंडेकर आणि राजा सामंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!