द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हयाच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : द युवा ग्रामीण पत्रकार संघ आयोजित शानदार सोहळ्यात होणार क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव
द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव दि.२० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता. जिल्हाध्यक्ष सागर शेळके ९००४४५८१०१ या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा व कार्याची माहिती कळवावी अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष सागर शेळके, उपजिल्हाध्यक्ष डॉ राजेंद्र सूर्यवंशी, प्रा बाबूराव घुरके, अभिजीत पाटील, नारायण लोहार, गोरख कांबळे, मंगेश उबाळे, लखन तलवारे, पाडूंरग बेलेकर, हर्षद कुंभोज, रोहन भिऊंगडे, सुभाष भोसले, विजय मोरबाळे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!