तिरुपती देवस्थानाकडून श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवात तिरुपती देवस्थानाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला मानाचा शालू येत असतो. त्यानुसार या वर्षीही तिरुपती देवस्थानाकडून आज श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात आला. या भरजरी शालूची किंमत एक लाख अठ्ठावीस हजार सातशे इतकी आहे. देवस्थान समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी तिरुपती देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून देवीचा शालू स्वीकारला.

error: Content is protected !!