भ्रमणध्वनी मोबाईल झाले स्विच ऑफ
आज दिवसभर उशिरापर्यंत युद्ध पातळीवर काम करून सुद्धा परिस्थिती जैसे थे
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव दशक्रोशीतील परिसरामध्ये काल सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. तर नांदगाव परिसरात विजेचे पोल व विद्युत लाईन वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याला २५ तास उलटून गेले असून विद्युत पुरवठा २५ तासाने सुरू करताच पुन्हा एकदा विज पुरवठा खंडित झाला असल्याने विज ग्राहक हैराण झाले आहेत. यामुळे नांदगाव परिसरातील बहुतेक भ्रमणध्वनी स्विच ऑफ झाले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. तसेच आज सोमवार असल्याने दिवसभर काम सुरू होते. तरीसुद्ध परिस्थिती जैसे थे












