ज्यूदोपट्टू स्वराज, साक्षी, तेजस, संस्कार, पृथ्वीराज,विहान आणि स्नेहल यांचा सुवर्ण पदकासह राज्याच्या संघात समावेश

व्यक्तिमत्व विकसित करणाऱ्या ज्यूदो खेळाच्या प्रगतीसाठी नेहमीच अग्रेसर राहीन – डॉ. विनय नातू

डेरवण येथील राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेचा पहिला दिवस खेळाडूंनी गाजवला

रत्नागिरी (प्रतिनिधी) : 51 वी राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅडेट गटाच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळी करत क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराज लाड, साक्षी कांबळे, ठाण्याच्या तेजस चव्हाण, संभाजीनगरच्या संस्कार मुसळे, कोल्हापूरच्या पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईच्या विहान कोटीयान यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात यवतमाळची स्नेहल ढोरे आणि क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवले.

शिओ तोशी या डावाने पीजेएच्या वृंदा शेलार हिला यवतमाळची स्नेहल ढोरे हिने आस्मान दाखवले तर क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे हिने योको गाके डावाचा योग्य वेळेत परिणामकारक वापर करून संभाजीनगरच्या श्रुतकिर्ती खलाटे हिला अंतिम चरणात हरवले. सातार्याच्या वेदांत पवारला क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराज लाड याने उशिरो गोशी या डावाने इप्पोन हा गुण घेऊन स्पर्धा संपवली. इप्पोन या पूर्ण गुणाने पराजित करणे हे उत्तम कौशल्याचे लक्षण ज्यूदो खेळात मानले जात असून दर्शन गवले या क्रीडा प्रबोधिनीच्या 55 किलोखालील खेळाडूस कोल्हापूरच्या पृथ्वीराज चव्हाण याने आणि मुंबईच्या विहान कोटीयान याने संभाजीनगरच्या ऋषिकेश पुंडला ओ-सोटो-गारी या पायाने आक्रमण करण्याच्या तंत्राने इप्पोन गुण घेतला.

दरम्यान सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन डेरवण विधानसभा मतदार संघातील चार वेळा आमदार राहिलेले आणि पूर्वाश्रमीचे जुनेजाणते ज्यूदो खेळाडू डॉ विनय नातू यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनोज बावदनकर, वरिष्ठ पत्रकार गणेश धनावडे, संकेत गोयथळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांबपटू शांताराम जोशी, एस व्ही जे सी टी संस्थेचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आणि पुना ज्यूदो असोसिएशनचे प्रतिनिधी अनिल संकपाळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ नातू म्हणाले की, ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्व विकासात ज्यूदोचा खूप मोठा वाटा आहे. भावाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी ज्यूदो खेळाकडे वळलो आणि त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अधिकच दृढ झाला. या खेळासाठी आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी मी नेहमीच तत्पर राहीन असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. संघटनेचे महासचिव शैलेश टिळकांनी स्पर्धांच्या 50 वर्षांचा आढावा घेताना सांगितले की, काथ्याच्या गाद्यांवरील खेळापासून आणि खेळाडूंच्या निवासासाठी अंथरलेल्या संतरंजीपासून ते आज खेळाडूंच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्याधुनिक साहित्यांची उपलब्धता आणि आरामदायक व्यवस्था पुरवण्याच्या प्रयत्नात विश्वस्त कायम प्रयत्नशील राहिले आहेत. आज यासाठी पुनीत बालन यांसारखे उद्योजक पुढे येवून ज्यूदो खेळाच्या उत्थापनेसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे याचा दृश्य परिणाम राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवताना दिसत आहेत. 50 वी सुवर्ण महोत्सवी स्पर्धा आयोजनाबाबत ज्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचप्रमाणे यापुढेही खेळाडूंच्या सोयीसुविधांसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे टिळक म्हणाले. राज्य संघटनेचे अध्यक्ष अँड. धनंजय भोंसले म्हणाले की आपला विद्यार्थी आपल्या समोर प्रमुख पाहुणा म्हणून बघण्याचे सुदैव आज मला लाभले आहे. विद्यार्थीदशेत खेळाची कौशल्य शिकलेले डॉ नातू यांचा आज सत्कार करताना गौरव वाटत असल्याची भावना भोंसले यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन रत्नागिरी ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे यांनी केले.

05 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यांचा निकाल खालीलप्रमाणे;
कॅडेट गट – मुले
50 किलोखाली
सुवर्ण – संस्कार मुसळे- संभाजीनगर
रौप्य – अथर्व थडके – कोल्हापूर
कांस्य – अरबाझ खान – मुंबई
कांस्य – हार्दिक खोडके- नाशिक

55 किलोखाली
सुवर्ण – पृथ्वीराज चव्हाण- कोल्हापूर
रौप्य – दर्शन गवले – क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – शंभू चोपडे- संभाजीनगर
कांस्य – शौर्या बिचुकले- पीडीजेए

60 किलोखाली
सुवर्ण – तेजस चव्हाण- ठाणे
रौप्य – तुषार साळुंखे- सांगली
कांस्य – अमन शहा- धुळे
कांस्य – सुभान शहा – संभाजीनगर

66 किलोखाली
सुवर्ण – विहान कोटीयान- मुंबई
रौप्य – ऋषिकेश पुंड- संभाजीनगर
कांस्य – संकेत शिंदे- सोलापूर
कांस्य – सोहम देवकर- क्रीडा प्रबोधिनी

73 किलोखाली
सुवर्ण – अंशराज जैस्वाल -सोलापूर
रौप्य – रोहित चव्हाण- नाशिक
कांस्य – आदित्य अवघडे- सातारा
कांस्य – सुरज सिंग- मुंबई

81 किलोखाली
सुवर्ण – स्वराज लाड – क्रीडा प्रबोधिनी
रौप्य – वेदांत पवार- सातारा
कांस्य – पार्थ वाघचवरे- अहमदनगर
कांस्य – प्रियांश ठाकूर- मुंबई

90 किलोखाली
सुवर्ण – अथर्व खंडागळे- धाराशिव
रौप्य – आर्यन मल्होत्रा- मुंबई
कांस्य – आदेश कोतकर- सांगली
कांस्य – हर्षवर्धन नागे- संभाजीनगर

90 किलोवर
सुवर्ण – मुजफ्फर सुभेदार-कोल्हापूर
रौप्य – शिवकरण पाटील-सांगली
कांस्य – अथर्व चौधर-क्रीडा प्रबोधिनी

कॅडेट गट – मुली
40 किलोखाली
सुवर्ण – स्नेहल ढोरे- यवतमाळ
रौप्य – वृंदा शेलार- पीजेए
कांस्य – मानसी गाठे -वर्धा
कांस्य – तन्वी घाडगे- सांगली

44 किलोखाली
सुवर्ण – साक्षी कांबळे-क्रीडा प्रबोधिनी
रौप्य – श्रुताकिर्ती खलाटे- संभाजीनगर
कांस्य – धनश्री भोयार- वर्धा
कांस्य – समीक्षा देखणे- सातारा

48 किलोखाली
सुवर्ण – भक्ती भोसले- ठाणे
रौप्य – वीणा गंधवले- कोल्हापूर
कांस्य – अनुष्का पवार- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – नंदिनी सूर्यवंशी- जळगांव

52 किलोखाली
सुवर्ण – वैष्णवी खलाणे- नाशिक
रौप्य – वैष्णवी मुधोळकर- यवतमाळ
कांस्य – पूर्वा सोहनी- कोल्हापूर
कांस्य – प्रणाली इथापे- सातारा

57 किलोखाली
सुवर्ण – श्रावणी डिके- यवतमाळ
रौप्य – श्रावणी शिताप- पीजेए
कांस्य – श्रेया मोरे- ठाणे
कांस्य – श्रुष्टी ओंबळे- सातारा

63 किलोखाली
सुवर्ण – समीक्षा सदावर्ते- कोल्हापूर
रौप्य – रुचिता शेंडे- वर्धा
कांस्य – आर्या अहिरे- ठाणे
कांस्य – कोकिला धवणे- क्रीडा प्रबोधिनी

70 किलोखाली
सुवर्ण – प्रेक्षा बोरकर- ठाणे
रौप्य – अमृता चौगुले- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – सानिका गोंधळी- रत्नागिरी
कांस्य – श्वेता गांधावले- कोल्हापूर

70 किलोवर
सुवर्ण – सायली विजेश- ठाणे
रौप्य – अष्टमी झगडे- मुंबई
कांस्य – अनुष्का मते- नागपूर
कांस्य – पूर्व कुटे- सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!