रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये नारायण राणे यांनी विजयी घोडदौड चालू ठेवली असून तब्बल 26 हजार 934 मतांची आघाडी तेराव्या फेरी अखेर घेतली आहे तेराव्या फेरी अखेर नारायण राणे यांना 19873 तर विरोधी उमेदवार विनायक राऊत यांना 16389 मते मिळाली तेरावी फेरी अखेर नारायण राणे यांना एकूण दोन लाख 51 हजार 394 तर विनायक राऊत यांना दोन लाख 24 हजार 460 मते मिळाली आहेत.