पुनीत बालन गृप प्रस्तूत 51 वी राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर ज्यूदो स्पर्धा

अटीतटीच्या लढतीत मोहितची जयवर्धनवर मात, संभाजीनगरच्या नवख्या ऋषिकेशने धुळ्याच्या धनंजयला झुंझवले, स्वराज आणि यशच्या रोमहर्षक लढतीत स्वराज विजयी

कॅडेट आणि ज्युनियर दोन्ही गटाचे सर्वसाधारण विजेतेपद ठाणे जिल्ह्यास तर कॅडेट गटाचे उपविजेतेपद कोल्हापूर आणि ज्युनियर गटाचे क्रीडा प्रबोधिनी यांना

रत्नागिरी (प्रतिनिधी) : ज्युनियर श्रेणीतील 55 किलोखालील वजनगटामध्ये ठाण्याच्या मोहित मौल्याने सातव्या मिनिटाला हराई गोशी डावाने आक्रमण करत इप्पोन गुणाने लढत जिंकली. एका सामन्याची चार मिनिटाची नियमित वेळ असते. कोल्हापूरच्या जयवर्धन कल्याणकरने जिंकण्याची पराकाष्ठा केली. निर्धारित वेळेच्या समया नंतर पुढे सुरु राहिलेली लढत सातव्या मिनिटाला मोहितने संपवली. अत्यंत अनुभवी आणि विजेता ठरलेल्या 66 किलोखालील वजन गटात धनंजयने आपली जिंकण्याची परंपरा कायम ठेवली, त्याला अंतिम सामन्यात मात्र संभाजीनगरच्या नवख्या ऋषिकेशने सहज विजय मिळवून दिला नाही. अनुभवाच्या बळावर ऋषिकेशच्या आक्रमणावर ओगोशी या डावाचे प्रति आक्रमण करत साडेतिनव्या मिनिटाला इप्पोन गुण घेऊन स्पर्धा संपवली. क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराजने दोन मिनिटे वीस सेकंदात तोमोई नागे या डावाने वाझाआरी हा अर्धा गुण घेत वर्चस्व मिळवले आणि लगेचच पुढे कोसोटो गाके डावाने आणखी अर्धा गुण घेऊन 81 किलोखालील गटात अजिंक्यपद राखले. मुलींच्या 52 किलोखालील गटात क्रीडा प्रबोधिनीच्या वैष्णवी पाटीलला मिळालेल्या हन्साको माके या पेनल्टी गुणामुळे नाशिकची वैष्णवी जिंकली.

दरम्यान, या वर्षी राज्य शासनाने वर्ष 2022-2023 करिता खेळाडू गटासाठी जाहीर केलेल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ठाण्याची ज्यूदोपटू कुमारी अपूर्वा पाटील हिचा सत्कार जेष्ठ ज्यूदो प्रशिक्षक डॉ. सतीश पहाडे यांच्या हस्ते करण्यांत आला. यावेळी उपस्थित अपूर्वाची आई वैशाली यांचे संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर अपुर्वाचे वडील महेश पाटील यांचे स्वागत अध्यक्ष धनंजय भोसले यांनी केले.

06 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यांचा निकाल खालीलप्रमाणे;
ज्युनियर गट – मुले
55 किलोखाली
सुवर्ण – मोहित मौल्या- ठाणे
रौप्य – जयवर्धन कल्याणकर- कोल्हापूर
कांस्य – सारंग शहाणे- अमरावती
कांस्य – तेजप्रकाश मिराशी- पिडीजेए
60 किलोखाली
सुवर्ण – प्रणित गोडसे- कोल्हापूर
रौप्य – रंजन गुप्ता- मुंबई
कांस्य – ओम हिंगमिरे- परभणी
कांस्य – सागर जाधव- यवतमाळ

66 किलोखाली
सुवर्ण – धनंजय खैरनार- धुळे
रौप्य – ऋषिकेश पुंड- छत्रपती संभाजीनगर
कांस्य – साबीर चव्हाण- यवतमाळ
कांस्य – विहान कोटीयान- मुंबई
73 किलोखाली
सुवर्ण – होर्माझ जीजीना-मुंबई
रौप्य – ईशान धाडवे- पिडीजेए
कांस्य – हर्ष शिंपी- जळगांव
कांस्य – रोहित चव्हाण- नाशिक
81 किलोखाली
सुवर्ण – स्वराज लाड- क्रीडा प्रबोधिनी
रौप्य – यश कांबळे- पिडीजेए
कांस्य – हर्ष समर्थ- नागपूर
कांस्य – अंशराज जैस्वाल- सोलापूर
90 किलोखाली
सुवर्ण – बालाजी एस. -पिडीजेए
रौप्य – गणेश मसलकर- बीड
कांस्य – पृथ्वीराज जाधव- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – व्यंकटेश हराळे- कोल्हापूर
100 किलोखाली
सुवर्ण – प्रतिक पवार- पीजेए
रौप्य – मुजफ्फर सुभेदार- कोल्हापूर
कांस्य – अथर्व चौधर- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – फहाद शेख- मुंबई
100 किलोवर
सुवर्ण – आदित्य परब- पिडीजेए
रौप्य – मनवर्धन पाटील- ठाणे
कांस्य – वीर खोना- मुंबई
कांस्य – यशराज जाधव- सातारा
ज्युनियर गट – मुली
44 किलोखाली
सुवर्ण – जान्हवी जाधव- पिडीजेए
रौप्य – पद्मजा अयर – ठाणे
कांस्य – ईश्वरी शिंदे- नाशिक
कांस्य – सुजीत प्रजापती- मुंबई
48 किलोखाली
सुवर्ण – भक्ती भोसले- ठाणे
रौप्य – आकांक्षा शिंदे- नाशिक
कांस्य – रेवती साळुंखे-सांगली
कांस्य – अनुष्का पवार- क्रीडा प्रबोधिनी
52 किलोखाली
सुवर्ण – वैष्णवी खलाणे- नाशिक
रौप्य – वैष्णवी पाटील- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – दिशा खरे- गोंदिया
कांस्य – प्रणाली इथापे- सातारा
57 किलोखाली
सुवर्ण – समृद्धी पाटील- क्रीडा प्रबोधिनी
रौप्य – श्रेया मोरे- ठाणे
कांस्य – नेहा साहू- मुंबई
कांस्य – श्रावणी डिके- यवतमाळ
63 किलोखाली
सुवर्ण – आर्या अहिरे- ठाणे
रौप्य – साक्षी मगदूम- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – जस्मिन जहान- मुंबई
कांस्य – वैष्णवी गाठे- वर्धा
70 किलोखाली
सुवर्ण – समीक्षा शेलार- कोल्हापूर
रौप्य – ग्रेहा परमार- मुंबई
कांस्य – आरती अधाणे- छत्रपती संभाजीनगर
कांस्य – प्रेक्षा बोरकर- ठाणे
78 किलोखाली
सुवर्ण – सायली विजेश- ठाणे
रौप्य – उन्नती जांभूळकर- पिडीजेए
कांस्य – पूर्वा कुटे- सोलापूर
कांस्य – तनुजा वाघ- नाशिक
78 किलोवर
सुवर्ण – धनश्री शिंदे- सोलापूर
रौप्य – संस्कृती पाटील- क्रीडा प्रबोधिनी
कांस्य – टीयाना दास- मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!