राजापूर रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालक मालक संघटनेचा किरण उर्फ भैय्या सामंत यांना पाठिंबा

अपूर्वा किरण सामंत, संदेश पटेल, भरत लाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

रत्‍नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसर रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने किरण उर्फ भैय्या सामंत यांना पाठिंबा देण्यात आला आहे. सोल्ये येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या आम्ही सर्व रिक्षा चालक पाठीशी आहोत असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमुख नेत्या म्हणून अपूर्वा किरण सामंत उपस्थित होत्या. यावेळी तालुका निरीक्षक संदेश पटेल, तालुका संघटक भरत लाड, विभागप्रमुख नाना कोरगांवकर, हसोळ सरपंच अमोल लाड, महिला उपतालुकाप्रमुख धनश्री शिंदे, उपविभाग प्रमुख वैष्णवी लाड, समाजसेवक शशिकांत प्रभुदेसाई, शाखाप्रमुख गोविंद सौंदळकर, अरुण शिंदे, आदींसह रिक्षा चालक मालक उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी अपूर्वा सामंत यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!