वैभववाडी (प्रतिनिधी) : फोंडा वैभववाडी उंबर्डे त्याचप्रमाणे भुईबावडा घाट या रस्त्यावरील झालेली कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत. निकृष्ट कामामुळे भुईबावडा घाटातील नवीनच बांधलेल्या संरक्षक भिंती त्याचप्रमाणे मोरीचे पाईप वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. या संपूर्ण घाट रस्ता व इतर कामांची चौकशी होऊन संबधींतांवर कारवाई व्हावी. यासाठी महाविकास आघाडीमार्फत १० ऑक्टोबर रोजी वैभववाडी तहसिल कार्यालया समोर उपोषण करणार असल्याची माहीती उबाठा तालुका प्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत लोके, चव्हाण बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, शिवसेनेच उपजिल्हा प्रमुख रजब रमदुल, कोळपे सरपंच सुनिल कांबळे, माजी सभापती लक्षमण रावराणे, विभाग प्रमुख विठोजी पाटिल आदि उपस्थीत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शासनाचा कोट्यावधी रुपये या विकास कामांवर खर्च झालेला असून हा सर्व पैसा पाण्यात गेला आहे. सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तर तालुक्यातील दोन्ही घाट बंद असल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे . निकृष्ट काम होणे हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. चौकट. तर करून घाटाच्या निकृष्ट कामासंदर्भात 11 ऑक्टॉबर रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खारेपाटण येथे कार्यालयासमोर सेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करणार आहे.
करूळ घाटाच्या संदर्भात सेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करूनही महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत यावेळी मात्र कार्यकारी अभियंता ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मंगेश लोके यांनी सांगितले आहे.