खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सवला आमदार नितेश राणे यांनी दिली सदिच्छा भेट

झुंझार मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद ; आमदार नितेश राणे

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सवाला आज मंगळवारी सायं.६.०० वाजता भाजप आमदार नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली.व शारदा देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी झुंझार मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने अध्यक्ष संकेत शेट्ये यांच्या शुभहस्ते आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार नितेश राणे यांच्या समवेत कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर,माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार,शक्तीकेंद्र प्रमुख सुधीर कुबल,सूर्यकांत भालेकर,खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,माजी सरपंच श्री रामकांत राऊत,ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले,जयदीप देसाई,भाजप कार्यकर्ते राजेंद्र वरुणकर,महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उज्ज्वला चिके,आदी पदाधिकारी उपस्थित होते.यांचा देखील झुंझार मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

“खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळाचे कार्य हे कौतुकास्पद असून ते राबवित असलेले उपक्रम समाजाला दिशादर्शक असे असल्याचे भावपूर्ण उदगार यावेळी आमदार नितेश राणे यांनी काढले.”या कार्यक्रमाला झुंझार मित्र मंडळाचे कार्यकर्ते महेश कोळसुलकर,प्रज्योत मोहीरे,संतोष गाठे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!