स्वच्छता निरीक्षकाकडून बेभरवशी आणि बेजबाबदार उत्तरे
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत चा कारभार सध्या प्रशासन चालवीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही. नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ग्रास कटर मशीन चे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झाले नाही. व याला जबाबदार पूर्णपणे स्वच्छता निरीक्षक आहेत असा आरोप माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी केला आहे. स्वच्छता निरीक्षक आपल्या स्व मार्जितल्या लोकांना खाजगीरित्या सफाई कामगार पाठवतात. तसेच कणकवली तहसीलदार ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये तहसील कार्यालयाला स्व निधी खर्च करण्याची तरतूद असूनही शहरातील जनतेची मूलभूत नागरी कामे बाजूला ठेवून स्वच्छता मोहीम राबविली गेली. कणकवली शहरात या प्रशासनाच्या कालावधीत जनतेला अतिशय वाईट अनुभव येत असून याला पूर्णपणे जबाबदार कणकवली न. पं. चे स्वच्छता निरीक्षक आहेत. आज शहरात इतर सुशोभीकरण होत असताना हायवे वरील व आतील रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. वारंवार तक्रार करूनही स्वच्छता निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे कणकवली शहरात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. तरी मुख्याधिकारी मॅडम यांनी प्रकरणी लक्ष द्यावा व कार्यालयीन कामाची चौकशी करावी अशी मागणी शहरवासियांन कडून होत आहे