वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे गावातील शेतकरी सुशांत सांगवेकर यांनी आपल्या शेतात छाया कृषि सेवा केंद्र वैभववाडी याच्या माध्यमातून मिळालेल्या महान या वाणाची लागवड आपल्या शेतात केली. पिकाची योग्य रित्या जोपासणी केली असता त्यांना या वाणाचा उत्तम रि्सल्ट मिळाला. महाऍग्री कंपनीने संशोधित केलेले महान ह्या भाताच्या वणाचा कालावधी 130-135 दिवस असून अतिशय फाईन अशी व्हॅरिटी असून त्याशिवाय उत्पन्न ही चांगल्या प्रकारचे देते. वाणाला उंचीही चांगली असून कोकणातील जमिनीला साजेशी अशी ही व्हॅरिटी आहे. कार्यक्रमाला कोकिसरे गावातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याबद्दल महाऍग्री कंपनीचेविठ्ठल वरक यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले.. कार्यक्रमाला वैभववाडी खरेदी-विक्री संघांचे व्यवस्थापक सिद्धेश रावराणे, कणकवली खरेदी-विक्री संघांचे किशोर राऊत व परब, काजवा कृषि सेवाकेंद्र पणदुरचे श्रीकांत उगवेकर, छाया कृषि सेवा केंद्र वैभववाडीच्या बोटले मॅडम, कोकण कृषिचे मुंडे, गायत्री कृषि सेवा केंद्राचे हरमळकर हे उपस्थित होते व शेती क्षेत्रातील या अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले