नानिवडे उबाठा सेनेचे शाखाप्रमुख ,उपशाखाप्रमुख ,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणेंनी केले भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील नानिवडे वाडेकरवाडी, महाजनवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दीपक साळवी, उपशाखाप्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती महाजन यांच्यासह सुरेश साळवी, भिकाजी साळवी, तुकाराम गावडे, ऋषिकेश जाधव, बाळकृष्ण गोरूले, सखाराम शिवगण, प्रकाश महाजन, गोविंद वाडेकर, सार्थक महाजन यांनी उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले व भाजपा पक्षात योग्य प्रकारे मान सन्मान दिला जाईल असा विश्वास दिला.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत असून उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाचे इंनमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावेळी प्रमोद रावराणे, नासिर काझी, दिलीप रावराणे राजा राणे, सचिन महाजन आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!