2 लाख 21 हजार रुपये बोनसचे वितरण; वार्षिक दूध संकलन एक लाख लिटर
वैभवाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या डेअरीचे वार्षिक दूध संकलन जवळजवळ १ लाख लीटर इतके आहे. या डेअरीमध्ये एकूण ६५ शेतकरी दूध संकलन करतात. यावेळी दिवाळी बोनस म्हणून लिटरला 3 रुपये इतका दर देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. यावर्षी एकूण 2 लाख 21 हजार रुपये इतक्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी अतिरिक्त दूध संकलनामध्ये उज्वला उदय मोरे, अरुण अमृत मोरे, विश्वनाथ राणे या तिघांनी अनुक्रमे नंबर मिळविला आहे. यावेळी रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव रविंद्र बिले, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, उज्वला मोरे, भुईबावडा गावचे प्रतिष्ठित नागरिक तानाजी मोरे, बाळा साईल, उमेश पांचाळ, श्वेता मोरे, अनिल देसाई, राजाराम मोरे, जनार्दन मोरे, रमेश मोरे, उदय मोरे, आकाराम मोरे, अमिन शाहा, प्रकाश साईल आदी शेतकरी उपस्थित होते.