कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने रक्तपिशवीचे शुल्क रुपये ४५० वरुन रुपये ११०० केले आहे. ते रद्द करावे याकरिता बुधवार दि. १५ मार्च रोजी तहसीलदार कणकवली यांना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुक्यातर्फे निवेदन देण्यात आले. सदर दरवाढ ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्तबॅग मोफत असणार आहे. केलेली दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसून ती तात्काळ थांबवावी, शासकीय रुग्णालयात काही सुविधा मिळत नसल्याने नागरिक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात त्या सुविधा प्रथम शासनाने सुधाराव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, उपाध्यक्ष अमोल भोगले, सल्लागार विनायक उर्फ बाळू मेस्त्री, सल्लागार राजन चव्हाण, कणकवली वैभववाडी विभागीय संघटक मकरंद सावंत, सचिव तन्वी भट-कुलकर्णी, रक्तदाते सुशिल परब, रुजाय फर्नांडिस, धनंजय सावंत, किरण सामंत, श्रीराम वाळके, सुशांत दळवी, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र गावकर, धीरज मेस्त्री, श्रध्दा पाटकर, प्रसाद सावंत, अक्षय मोरे, संकेत कोकाटे, सचिन कोचरे, दिग्विजय मुरगुड, महेश शिरसाट, सुदेश कराळे, शुभम पारधीये आदी रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.