कामावर हजर व्हा… अन्यथा वेतनकपातीसह शिस्तभंगाची कारवाई

कोकण विभागीय आयुक्तांची जुनी पेंशनधारक संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : जे सरकारी कर्मचारी नोव्हेंबर 2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेंशन लागू आहे, तरीही जे जुनी पेंशन धारक कर्मचारी बेमुदत संपावर आहेत त्यांनी कामावर हजर व्हा अन्यथा वेतनकपातीसह शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटिसच कोकण विभागीय महसूल आयुक्त महेश रानडे यांनी काढली आहे. या नोटीसीमुळे संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जुनी पेंशन नोव्हेंबर 2005 नंतर च्या सरकारी कर्मचाऱ्यांना ही जुनी पेंशन लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील 18 लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17 हजार हुन अधिक सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. यात महसूल विभागाचेही चतुर्थ आणि तृतीय वर्गातील कर्मचारी सहभागी आहेत. मात्र 14 मार्च रोजी कोकण विभागीय आयुक्तांनी काढलेल्या नोटीस मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की जे कर्मचारी नोव्हेंबर 2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू आहेत त्यांना जुनी पेंशन लागू आहे. असे असतानाही जुनी पेंशन लागू करण्यासाठी अंशदायी पेंशन असणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आपण संपात सहभागी आहात हे अशोभनीय आहे. आपल्यावर संपकाळातील वेतनकपातीसह शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये ? याचा खुलासा करावा असे नोटीसीत बजावले आहे.या नोटिसीमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!