कणकवली (प्रतिनिधी) : माजी आमदार परशुराम उपरकर आणि भाजपाचे नेते राजन तेली यांनी शिवसेना उबाठा मध्ये पक्षप्रवेश केला असून आम्ही त्यांचे स्वागत करतो असे शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले. 1990 पासून सिंधुदुर्गात शिवसेना वाढविण्यात आणि नारायण राणे यांना आमदार म्हणून निवडण्यात परशुराम उपरकर आणि राजन तेली यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकित शिवसेनेचा भगवा फडकविण्यात उपरकर आणि तेली यांनीच मोलाची भूमिका वठवली होती.तेली आणि उपरकर यांच्या स्वागतासाठी उद्या 22 ऑक्टोबर रोजी सकाळी कणकवली येथे भगवती मंगल कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्या भव्य स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत सत्कार होणार आहे.