महाराष्ट्र शासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा

माहे फेब्रुवारी 2023 पूर्वी नियुक्त्यांसाठी प्रलंबित प्रकरणांचा मंजुरीचा मार्ग अखेर मोकळा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देताना जातीची अट शिथिल करून कोणत्याही जाती धर्माच्या सफाई कामगारांना सरसकट लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार लाभ देण्यात यावा महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे लावून धरण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी 24 फेब्रुवारी 2023 ला वारसांना वारसा हक्क लाभ देणे बाबत सुधारित तरतुदी अमलात आणलेल्या होत्या. मात्र महाराष्ट्र शासनाच्या सदर शासन निर्णयास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून स्थगिती घेण्यात आलेली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या वारसांना वारसा हक्काचा लाभ देण्यास वंचित राहिले होते वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाने घेतलेले धोरण निश्चित करून लागू करण्यात याव्यात जेणेकरून सफाई कामगारांना दिलासा मिळेल यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा चालू होता लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत सफाई कामगारांना दिलासा देण्याचे लक्षवेधी कार्य केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भात सुधारित शासन निर्णय पारित करून 24 फेब्रुवारी 2023 पूर्वीच्या सर्व प्रलंबीत प्रकारणांना वारसा हक्काबाबत यापूर्वी निर्गमित केलेल्या सुधातीत तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेऊन सफाई कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे.राज्यातील हजारो सफाई कामगारांना व त्यांच्या वारसांना याचा लाभ मिळणार असून महायुती सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे माहिती कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!