स्थानिक प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; नागरिकांची मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील अनेक परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून अशा कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक संबंधित प्रशासनाने या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे. वैभववाडी शहरातील बॅंक परिसर, चौक व फुटपाथवर या भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येतो विशेषतः दत्त मंदिर पाहून ते दत्त विद्या मंदिर वैभववाडी या सांगुळवाडी रोड परिसरात रस्त्याकडेला पादचाऱ्यांसाठी बांधलेले फुटपाथ तसेच बॅंकेच्या आवारात हि भटकी कुत्री बसलेली पहायला मिळतात. त्यामुळे रस्त्यावरून चालत जाणे सोडाच फुटपाथवर देखील या भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात शालेय विद्यार्थी व पालक, नागरिक दररोज ये जा करत असताना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे.